नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन वेगळ्या पिकांच्या उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळवण्याचा विचार करण्याची गरज आहे.

पारंपरिक शेती खर्चिक व निसर्गावर अवलंबून असल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. यावर मात करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.

बांबू शेती (Bamboo Farming) हा त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. बांबूला हिरवे सोने असेही म्हटले जाते.

ज्या शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी हवी आहे, त्यांनी बांबू शेती करावी, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बांबूचा वापर विविध उद्योगधंद्यांत केला जातो. तसंच फर्निचर निर्मितीसह अनेक कामांसाठी बांबू वापरला जातो.

तुम्हाला जाणून थोडंसं आश्चर्य वाटेल, की भारत दर वर्षी 60 दशलक्ष कोटी रुपये किमतीच्या बांबूची आयात (Bamboo Import) करतो.

त्यामुळे तुम्हीदेखील या हिरव्या सोन्याची शेती करणार असाल तर तुम्ही लवकरच लखपती होणार आहात. बांबू शेती कशी करायची, याचे फायदे आणि बाजारपेठ या विषयी सविस्तर जाणून घेऊ या.

देशातलं बांबू उत्पादन वाढावे, यासाठी केंद्र सरकारने बांबू मिशन (Bamboo Mission) सुरू केले आहे.

या अंतर्गत शेतकऱ्यांना बांबू शेती करण्यासाठी प्रतिझाड 120 रुपये शासकीय अनुदान (Government Subsidy) दिले जाते.

देशात सातत्याने बांबूची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तुम्ही बांबू शेती सुरू केली तर मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो.

बांबूची शेती हंगामानुसार (Season) केली जात नाही, तसेच अन्य पिकांसाठी जसा वेळ द्यावा लागतो तसा वेळ या पिकासाठी द्यावा लागत नाही.

एकदा बांबू लागवड केली, की 4 वर्षांनंतर बांबू कापणी केली जाते. बांबूच्या दोन झाडांमधील अंतर 5 फूट ठेवावे लागते.

यानुसार 3 वर्षांत सुमारे 240 रुपये प्रति झाड खर्च येतो. यातही सरकार तुम्हाला 120 प्रति झाड याप्रमाणे शासकीय अनुदान देते.

या गोष्टी लक्षात ठेवा

बांबूशेती सुरू करण्यापूर्वी बांबूविषयी सर्वांगीण माहिती घेणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या जातीच्या बांबूची लागवड करायची आणि बाजारात त्याची विक्री कशा पद्धतीने करायची आहे, हे ठरवावे लागेल.

बांबूच्या 136 जाती आहेत. त्यामुळे लागवडीच्या अनुषंगाने तुम्हाला शंका निर्माण होऊ शकतात, अडचणी येऊ शकतात.

त्यामुळे कृषी विभागातल्या आपल्या जवळच्या कार्यालयात किंवा या विषयातल्या तज्ज्ञाकडून किंवा कृषी विज्ञान केंद्रातून याबद्दलची पूर्ण माहिती लागवडीआधीच मिळवणे अत्यावश्यक आहे. बाजारपेठ निश्चित माहिती झाल्याशिवाय उगाचच लागवड करण्याची घाई करून उपयोग नाही.

उत्पन्नाचे गणित

तुम्ही 3 मीटर बाय 2.5 मीटर अंतरावर बांबूची झाडं लावली, तर एक हेक्टर क्षेत्रात सुमारे 1500 रोपांची लागवड होईल.

तसेच दोन झाडांमधल्या मोकळ्या जागेत तुम्ही अन्य पिकंही घेऊ शकता. 4 वर्षांनंतर 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न सुरू होऊ शकेल.

दर वर्षी पुनर्लागवड करण्याची गरज नसते. कारण बांबूचे झाड किमान 40 वर्षं जगू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here