महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाची आणखी एक लाट आहे. खरीप हंगाम जवळ आला असताना, शेतक्यांनी पेरणीपूर्व मशागत व इतर कामे सुरू केली आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी बियाणे व खते खरेदी करताना कोरोना नियम पाळावेत. शेतकऱ्यांनी सुरक्षित राहून शेतीची कामे करावीत. कोरोना पासून स्वतःच बचाव करावा, असे आवाहन बनसोडे यांनी केले आहे.
खरीप हंगामाच्या कामासाठी सर्वच शेतकरी बियाणे आणि रासायनिक खतांसाठी कृषी केंद्रावर जातांना शेतकऱ्यांनी सुरक्षित अंतर ठेवून कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर शेती करताना कोरोनाचे सर्व नियम शक्य तितके जास्त प्रमाणात पाळले पाहिजे, असे आवाहन ना.बनसोडे यांनी केले आहे.
लक्षणे दिसली तर चाचणी करा
कोरोनाशी संबंधित लक्षणे आढळल्यास शेतकऱ्यांनी उशीर करू नये. जवळच्या रुग्णालयात, तालुका रुग्णालयात किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तातडीने चाचणी व उपचारांसाठी जाण्याचे आवाहन केले आहे.
ग्रामीण भागात संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे
शहरी भागाच्या तुलनेत कोरोनाच्या दुसर्या लाटातही ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली. म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना त्रिसूत्रीचा अवलंब करुन सुरक्षित रहावे असे नामदार बनसोडे यांनी आवाहन केले आहे.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या घटत आहे
राज्यात मंगळवारी 40 हजार 956 नवे कोरोना रुग्ण सापडले, तर कोरोनामुक्तांची संख्या 71 हजार 966 झाली होती. तर राज्यात 793 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे.
राज्यात सध्या 5 लाख 58 हजार 996 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 51 लाख 79 हजार 929 कोरोना रुग्णांना संसर्ग झालाय. कोरोनातून मुक्त झालेल्यांची एकूण संख्या 45 लाख 41 हजार 391 एवढी आहे. त्याचवेळी कोरोनानं राज्यात आतापर्यंत 77 हजार 191 लोकांचा मृत्यू झाला आहे.