प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर उर्जा विभागाच्या वतीने राज्यभरात महाकृषी उर्जा अभियान सुरु केले.
हे अभियान शेतकऱ्यांसाठी महत्वाचे ठरत आहे. या अभियानामुळे कृषीपंप थकबाकीतून पुर्णपणे मुक्त होण्याच्या संधीचा फायदा अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे.
जिल्ह्यातील एकूण २९ कृषिपंपधारक शेतकरी अनेक वर्षापासून थकीत वीजबील एकरकमी भरुन थकबाकीमुक्त झाले. या अभियानांतर्गत ३० मीटरच्या आतील सर्व कृषी ग्राहकांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे.
तसेच ज्या कृषीपंप अर्जदाराचे अंतर लघुदाब वाहिनीच्या २०० मीटरच्या आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे, अशा नवीन कृषीपंप ग्राहकांना तीन महिण्याच्या आत नवीन जोडणी देण्यात येईल.