देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या पीएम किसान योजनेचा (PM Kisan Scheme) आठवा हफ्ता दिला आहे.

सरकारने देशातील ९.५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना कमी दराने कर्ज देण्यात येत आहे. किसान क्रेडिट कार्डच्या (KCC Kisan Credit Card) माध्यमातून हे कर्ज देण्यात येत आहे.

आत्मनिर्भर भारत योजनेच्या अंतर्गत हे कर्ज देण्यात येत आहे. या योजन सर्व शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी शासनाने काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्यानंतर सर्व बँका आणि वित्तीय संस्थानी जे शेतकरी कर्ज घेऊ इच्छितात त्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला.

तुम्हीही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेतला आहे आणि आता तुम्हालाही कमी दरात कर्ज घ्यायचे आहे का? त्यासाठी अर्ज कसा करावा हे जाणून घ्या.

PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर या योजनेचा फॉर्म देण्यात आला आहे. बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड आणि फोटोची असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.

ज्यात सांगवे लागले की तुम्ही कोणत्याही बँकेतून कर्ज घेतलेले नाही. केसीसी तयार करण्यासाठी सहकारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, भारतीय राष्ट्रीय पेमेंट कार्पोरेशन बँक ऑफ इंडिया,स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँकेशी संपर्क साधू शकता.

अर्ज असा करा !

  • पहिल्यांदा पीएम किसानच्या www.pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • तिथे केसीसीKCC फॉर्म डाऊनलोड करा.
  • फॉर्ममध्ये योग्य माहिती भरुन त्या फॉर्मची प्रिंट जवळच्या बँकेत जमा करा.
  • किसान क्रेडिच कार्डवर शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. त्यावर ९ टक्के दराने व्याज आकारले जाईल. त्यावर शासनाकडून २ टक्के अनुदान देण्यात येईल.
  • त्यामुळे शेतकऱ्याना ७ टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे. मात्र जर शेतकऱ्यांनी योग्य वेळी पैसे जमा केले तरच त्यांना व्याजावर ३ टक्के सूट मिळेल. त्यामुळे एकूण फक्त ४ टक्के दराने व्याज आकारले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here