आरोग्यवर्धक लसूण

लसणाचा उपयोग स्वयंपाकात अन्न स्वादिष्ट होण्यासाठी व औषधोपचारासाठी केला जातो. लसणामध्ये मॅंगेनीज, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब, जीवनसत्त्व क, सेलेनियम, तंतुमय घटकांचे चांगले  प्रमाण असते.

कॅल्शिअम, तांबे, पोटॅशिअम, फॉस्फरस, लोह  तसेच लसणामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते. लसणामध्ये एलिसीन घटक असतो. त्यामुळे रोग प्रतिकारक घटक असतात.

लसूण पेस्ट 

 • घटक : लसूण,आले, संरक्षक
 • लसूण, आले ताजे आणि निरोगी असावे. लसूण व आले स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.
 • लसूण, आल्याच्या वरच्या भागाची साल काढावी. साल काढण्यासाठी पिलर यंत्राचा वापर करावा. त्यानंतर क्रशिंग यंत्राच्या साह्याने आले, लसूण पूर्ण बारीक करून घ्यावे.त्यानंतर पल्पिंग यंत्रामधून एक सारखी पेस्ट तयार करावी. आवश्यकतेनुसार हळद, मीठ, पाणी आणि संरक्षक पदार्थ सोडियम बेंझोएट (१५० पीपीएम) मिसळावे.
 • लसूण पेस्टसाठी लिक प्रूफ पॅकेजिंग आवश्यक आहे.

आरोग्यदायी फायदे  

 • रोगप्रतिकारशक्ती सुधारते. सर्दी आणि खोकला अशा आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
 • वजन कमी करण्यास साह्य,ॲलर्जी कमी होते.
 •   लसणाच्या पाकळ्या भाजून खाल्ल्यास लहान मुलांना श्वास घेताना होणारा त्रास दूर होतो.
 • लसणाच्या सेवनामुळे सर्दीपासून लवकर आराम होतो. घशाला होणाऱ्या संसर्गापासूनही बचाव होतो.
 • श्वसनविकारात लसूण गुणकारी आहे.
 • ताज्या लसणाच्या सेवनामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका कमी होतो.
 • दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम मिळते.
 • लसूण रक्ताभिसरण सुधारतो. त्वचा तरुण आणि चमकदार होते. मौखिक  आरोग्य  सुधारते.
 • भाजलेला लसूण खाल्ल्याने दाताचे दुखणे कमी होते. दात दुखत असल्यास लसूण वाटून तो दुखणाऱ्या दातांवर ठेवावा.
 • लसणात लोह असते. रक्त तयार होण्यास लोह आवश्यक असते. तसेच क जीवनसत्त्व असल्यामुळे स्कर्वी रोगापासूनही बचाव होतो.
 • डायरिया विकारामध्ये आराम मिळतो.
 • यकृत आणि मूत्राशयाचे कार्य सुरळीत चालू राहण्यास मदत होते.
 • सांधेदुखीसाठी अतिशय गुणकारी आहे.
 • लसणाच्या सेवनामुळे पचनसंस्था चांगली होते.
 • लसूण शरीरात इन्शुलिनचे प्रमाण वाढविते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.
 • लसणाच्या सेवनाने केस गळणे बंद होते. लसणात अ‍ॅलिसिनचे प्रमाण भरपूर आहे. तसेच सल्फरही असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here