आपल्याला अनेकदा शेतकरी असल्याचा दाखला हवा असतो. तो काढायला गेल्यानंतर आपल्याला हेच माहित नसते कि हा दाखला कसा काढायचा.

यासाठी योग्य माहिती नसल्याने मनस्ताप होतो. या बद्दल सोपी आणि सुटसुटीत माहिती उपलब्ध करून देत आहोत.

तुमच्या मोबाईलचा किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउजर मध्ये जायचे आहे. तिथे टाइप करायचे आहे aaplesarkar.mahaonline.gov.in. या पोर्टल वर तुम्ही पहिल्यांदा जर भेट देत असाल तर तुम्हाला नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता राहील.

त्यासाठी तुम्हाला येथे नोंदणी करावी लागेल. या ठिकाणी क्लिक करायचे आहे, असे केल्यावर तुमच्या पुढे दोन पर्याय येतात.

एक मोबाईल द्वारे आणि दुसरा म्हणजे कागदपत्रे देऊन तुम्ही नोंदणी करू शकता. तर समजा जर तुम्ही मोबाईलद्वारे नोंदणी करण्यासाठी निवडले तर खाली तुम्हाला तुमचा जिल्हा, दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे.

त्याचप्रमाणे तुम्हाला तेथे एक युजरनेम टाकायचे आहे आणि तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी तुम्हाला तेथे टाकायचा आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरळीत सुरु होईल, फक्त टप्याटप्याने सूचनांचे पालन करायचे.

युजर नेम टाकल्यानंतर check availability यावर क्लिक करायचे आहे, तुमचा युजर नेम आधी कोणी वापरत आहे का नाही ते तुम्हाला कळेल, जर ते युजरनेम आधीच अस्तित्वात असल्यास तुम्हाला दुसरा युजरनेम वापरून नोंदनी करावी लागेल.

नोंदणी झाल्यानंतर मुख्यपृष्ठावर येऊन तुम्हाला तिथे तुमचे युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. तसेच तुमचा जिल्हा टाकायचा आहे. डाव्या बाजुच्या विभागांमध्ये महसूल सेवा असे निवडायचे आहे आणि पुढे जा या बटणावर क्लीक करायचे आहे.

आता तुमच्या पुढे अनेक पर्याय उपलब्ध होतील, त्यापैकी शेतकरी असल्याचा दाखला यापुढे टीक करायचे आहे आणि पुढे जा या बटणावर टिक करायचे आहे.

आता पुन्हा शेतकरी असल्याचा दाखला या बटनावर टिक करायचे आहे. आता पुढे गेल्यावर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे विचारली जातील.

यामध्ये आपल्याला ओळखीचा पुरावा मध्ये दिलेल्या आठ कागदपत्रांपैकी कोणताही एक कागद, पुरावा म्हणून देता येईल तसेच खाली दिलेल्या पत्त्याचा पुरावा पर्यायांपैकी एक कोणताही पुरावा तुम्हाला द्यायचा आहे व इतर दस्तऐवज मध्ये देखील संबंधित जागेचा सातबारा आणि 8अ चा उतारा द्यायचा आहे.

तसेच काही अनिवार्य कागदपत्रे आहेत ते आहेत स्वयंघोषणापत्र आणि इतर त्यानंतर तुम्हाला पुढे जा या बटणावर क्लीक करायचे आहे.

आता तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल, त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, वडिलांचे नाव, तुमचा व्यवसाय, राष्ट्रीयत्व तसेच निवासाचा तपशील म्हणजेच पत्ता तसेच आपण कोणत्या क्षेत्रात राहतो.

जसे की शहरी किंवा ग्रामीण, शहरी असल्यास प्रभाग क्रमांक कोणता आहे आणि खाली जमिनीचा तपशील टाकायचा आहे.

ज्यामध्ये जमीन त्याच्या नावावर आहे त्याचे नाव अर्जदाराशी नाते, जिल्हा, तालुका,गाव पिन कोड क्रमांक, गट क्रमांक तसेच जमिनीचे क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळाचे एकक काय आहे ते टाकायचे आहे.

तसेच गावाबाहेर आपल्या मालकीची जमीन आहे का ते हो किंवा नाही यामध्ये टीक करायचे आहे आणि समावेश करा या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे आहे.

त्यानंतर आपल्याला आपली कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्यामध्ये ओळखीचा पुराव्यांमध्ये आपण जो कोणता कागद अपलोड करणार आहे त्याच्याकडे टिक करायचे आहे.

आणि अपलोड फाईल या बटणावर क्लिक करून अपलोड करायचे आहेत. तसेच इतर कागदपत्रे देखील अपलोड करून घ्यायचे आहेत.

तिथेच खाली दिलेल्या स्वयंघोषणापत्र या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्वयंघोषणापत्र जे की तुम्ही प्रिंट काढून त्याचा फोटो किंवा स्कॅन करून अपलोड करू शकता.

आता सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर खाली दिलेल्या अपलोड डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तुम्हाला तुमच्या पुढे मेसेज आलेला दिसेल.

तुमचे दस्तऐवज यशस्वीरीत्या जतन करण्यात आले आहेत कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा .आता ok या बटणावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला त्याचे काही चलन असेल, त्याप्रमाणे पैसे भरायचे आहेत आणि पुढे आलेल्या पुष्टी करा या बटनावर क्लिक करायचे आहे.तुम्ही चलन भरताना ऑनलाईन किंवा ऑफलाईन द्वारे भरू शकता, ऑनलाइन पेमेंट करताना तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड,आयएमपीएस करू शकता.

तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडायचा आहे. Proceed for Payment या बटणावर क्लीक करायचे आहे येथे तुम्हाला आता तुमच्या पेमेंट डिटेल्स टाकायचे आहेत.

Make Payment या बटणावर क्लीक करायचे आहे, असे केल्यावर तुमचा अर्ज पूर्णपणे भरलेला असेल. तुमचा भरलेला अर्ज तुम्हाला अर्जांचा आढावा यामध्ये तपासून पाहायला मिळेल. तर अशाप्रकारे तुम्ही शेतकरी असल्याचा दाखला मिळवू शकता.

ओळखीचा पुरावा (किमान -1)

 • 1) पारपत्र
 • 2) पॅन कार्ड
 • 3) आधार कार्ड
 • 4) मतदार ओळखपत्र
 • 5) मरारोहय जॉब कार्ड
 • 6) निमशासकीय ओळखपत्र
 • 7) आर एस बी वाय कार्ड
 • 8) वाहनचालक अनुज्ञप्ति

पत्त्याचा पुरावा (किमान -1)

 • 1) पारपत्र
 • 2) वीज देयक
 • 3) भाडेपावती
 • 4) शिधापत्रिका
 • 5) दूरध्वनी देयक
 • 6) पाणीपट्टी पावती
 • 7) मालमत्ता करपावती
 • 8) मतदार यादीचा उतारा
 • 9) वाहनचालक अनुज्ञप्ति
 • 10) मालमत्ता नोंदणी उतारा
 • 11) 7/12 आणि ८ अ चा उतारा

इतर दस्तऐवज (किमान -1)

 • 1) संबंधित जागेचा ७/१२ आणि ८-अ चा उतारा

अनिवार्य कागदपत्रे(सर्व अनिवार्य)

 • 1) स्वघोष्णापत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here