Individual Farm Ponds Online Application

लातूर : कृषि विभाग महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत लातूर जिल्हयामधील 282 गावांमध्ये राबविला जात आहे.

हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थितीशी जूळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने वैयक्तिक शेततळे या घटकाचा समावेश नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पात करण्यात आला आहे.

यासाठी उद्दिष्ट पूढील प्रमाणे आहेत. प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गाव समुहातील अल्प व अत्यअल्प शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे.

वाचा : ‘मागेल त्याला शेततळे’च्या ८४ कोटी अनुदानाची प्रतीक्षा | नवीन शेततळ्याची कामे बंदच

संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे. दुबार पिकाखालील क्षेत्र वाढवणे व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे. अर्थसहाय्य- वैयक्तिक शेततळे या घटका अंतर्गत खोदकामासाठी देय अनुदानाची कमाल रक्कम रु. 50 हजार राहील.

सोबतच शेततळे आस्तरिकरण या घटकाखाली प्लास्टिक फिल्म आस्तरिकरणासाठी लागणाऱ्या खर्चाच्या 75 टक्के किंवा जास्तीत जास्त 1 लाख 17 हजार 95 रुपयेचे मर्यादेत (या पैकी जी रक्कम कमी असेल ती ) अर्थसहाय्य देय राहील.

जिल्हयातील इच्छुक शेतकऱ्यांनी Online अर्ज https://dbt.mahapocra.gov.in या वेबसाईटवर सादर करावे.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.एस.गावसाणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here