सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त पैसे लावण्याचीही व इतर पिकांसारखे फटका बसण्याची भीती नाही. यासाठी नियोजन आणि बाजारपेठ याची सांगड घालण्याची गरज आहे. एवढे केले तर हा व्यवसाय तुम्हाला लखपती केल्याशिवाय राहणार नाही. हा व्यवसाय म्हणजे काकडीची शेती.

कोरोनाच्या या कठीण काळात तुमच्याकडे नोकरी नाही. तुम्हाला नोकरी करण्याचा कंटाळा आला आहे, किंवा तुम्हाला अधिक पैसे कमावण्याची इच्छा असेल तर एक उत्तम संधी तुमच्याकडे चालून आली आहे.

कारण आता तुम्हीही स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त पैसे गुंतवण्याचीही गरज नाही आहे.

हा व्यवसाय म्हणजे शेती. आता शेतीत काय करावे हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही काकडी फार्मिंग (Cucumber Farming) करून लाखो रुपये कमवू शकता.

मार्चमध्ये काकडीचे उत्पादन सुरू करुन लाखो रुपये कमवा!

या पिकाचा कालावधी 60 ते 80 दिवसांत पूर्ण होते. खरेतर, उन्हाळ्यात काकडीचे उत्पादन घेतले जात आहे. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा काकडीची पेरणी करण्यासाठी सर्वोत्तम आहे.

काकडीची लागवड सर्व प्रकारच्या मातीत करता येते, परंतु चांगली निचरा होणारी चिकणमाती आणि वालुकामय चिकणमाती जमीन चांगल्या उत्पादनासाठी पूरक मानली जाते.

काकडी लागवडीसाठी जमीन पीएच 5.5 ते 6.8 चांगली मानली जाते. काकडीची लागवड नद्या व तलावाच्या काठावरही करता येते.

शेतकऱ्यांचे म्हणणे काय आहे?

काकडीची लागवड करुन लाखोंची कमाई करणाऱ्या शेतकऱ्यांचा अनुभजव असा आहे की, शेतीत काकडी लागवड करून अवघ्या 4 महिन्यांत 7-8 लाख रुपये मिळवले आहेत.

त्यांनी आपल्या शेतात नेदरलँड्स जातीची काकडी पेरली. नेदरलँडमधील ही प्रजाती काकडीची बियाणे आता सर्वत्र मिळू लागले आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रजातीमध्ये काकडीमध्ये बिया नसतात. ज्यामुळे हॉटेल, मोठे समारंभ, जिथे मोठ्या प्रमाणात काकडी लागते त्या ठिकाणी मागणी खूप जास्त आहे.

का आहे या व्यवसायाची मागणी?

या काकडीचे वैशिष्ट्य म्हणजे सामान्य काकडीच्या तुलनेत याची किंमत दुप्पट आहे. देशी काकडी 20 रुपये प्रति किलोने विकली जात असेल आहे तर नेदरलँड जातीची काकडी 40 ते 45-50 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कमी खर्चात जास्ती उत्पादन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here