काकडी लागवड तंत्र

शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन हळूहळू बदलू लागला आहे. अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे (Agriculture) वळू लागले आहेत.

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (modern technology) देखील मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे कमी गुंतवणुकीत जास्त पैसे मिळू लागले आहेत.

उत्तरप्रदेशमधील (Uttar Pradesh) एका शेतकऱ्याने तर चक्क नेदरलँडच्या काकडीची (Netherland Cucumber) लागवड करून 8 लाख रुपये कमावल्याचे समोर आले आहे.

चार महिन्यातच इतक्या मोठ्या प्रमाणात कमाई केली असून विशेष म्हणजे शासनाकडूनही नेदरलँडच्या काकडीच्या (Netherland Cucumber) उत्पादनासाठी अनुदान मिळत आहे.

काकडी हे भारतीय पिक असल्‍याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडीची लागवड उन्हाळ्यात सुरुवातीला जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जून-जूलै महिन्यात करतात. ही एक दररोज उपयोगात येणारी वेलवर्गीय फळ भाजी आहे.

 • फेब्रुवारीचा दुसरा आठवडा काकडीच्या पेरणीसाठी सर्वोत्तम असतो.
 • काकडीची लागवड सर्व प्रकारच्या मातीत करता येते.
 • पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आणि वाळू असणारी मातीची जमीन या उत्पादनासाठी चांगली मानली जाते.
 • नद्या व तलावाच्या काठावरही काकडीची लागवड करता येते.
 • जमिनीचा पीएच 5.5 ते 6.8 हा काकडी लागवडीसाठी चांगला मानला जातो.

ज्यांनी काकडीच्या लागवडीतून लाखो रुपये कमावले ते उत्तर प्रदेशमधील शेतकरी दुर्गाप्रसाद सांगतात की, नेदरलँडमधील काकड्यांच्या प्रजाती मध्ये बिया नसतात.

त्यामुळे हॉटेल (hotel) आणि रेस्टॉरंट्समध्ये (restaurant) या काकडीची मागणी खूप जास्त आहे.
या काकडीच्या लागवडीसाठी बागायती विभागाकडून 18 लाख रुपयांचे अनुदान घेतल्यानंतर शेतात सेडनेट हाऊस बांधले. त्यानंतर स्वत: कडील आणखी 6 लाख रुपये खर्च केला.

 • याशिवाय नेदरलँड कडून 72 हजार रुपये किमतीचे बियाणे मागवले.
 • सामान्य काकड्यांच्या तुलनेत ही काकडी दुप्पट पीक देते.
 • साधारण चार महिन्यानंतर 8 लाख रुपयांची काकडी त्यांनी विकली.
 • बाजारात स्वदेशी काकडीची किंमत 20 रुपये प्रति किलोच्या आसपास असते.
 • तर नेदरलँडमधील या काकडीची विक्री 40 ते 45 रुपये किलोच्या हिशोबाने होते. शिवाय या काकडीची मागणी वर्षभर असते.
 • त्यामुळे कोणाला सोप्या पद्धतीने पीक घेऊन कमी दिवसात जास्त उत्पन्न घेऊ शकतो.
 • या काकडीच्या मार्केटिंग (marketing) करण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाची (social media) मदत घेऊ शकता.

सुधारित वाण

 • पुना खिरा – या जातीमध्‍ये हिरवे आणि पिवळट तांबडी फळे येणारे दोन प्रकारचे बियाणे बाजारात मिळते. ही लवकर येणारी जात असून फळे आखूड असतात. ही जात उन्‍हाळी हंगामात चांगली असून हेक्‍टरी उत्‍पादन 13 ते 15 टन मिळते.
 • शीतल – ही जात डोंगर उताराच्‍या हलक्‍या आणि जास्‍त पावसाच्‍या प्रदेशात चांगली वाढते. बी पेरणीपासून 45 दिवसांनी फळे चालू होतात.
 • फळे रंगांनी हिरवी व मध्‍यम रंगाची असतात कोवळया फळांचे वजन 200 ते 250 ग्रॅम असते हेक्‍टरी उत्‍पादन 30 ते 35 टन मिळते.
 • प्रिया –ही संकरीत जात असून फळे रंगाने गर्द हिरवी व सरळ असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 30 ते 35 टन मिळते.
  पुसा संयोग – लवकर येणारी जात असून फळे हिरव्‍या रंगाची असतात. हेक्‍टरी उत्‍पादन 25 ते 30 टन मिळते.
 • हिमांगी –पूना खिरापेक्षा उत्पादन जास्त,फळांना चांगला बाजारभाव मिळतो.
 • फुले शूभांगी – केवडा रोगास प्रतिकारक,अधिक उत्पन्न देणारा वाण.
  या शिवाय पॉंइंट सेट जिप्सी, रिझवानया जातीही शेतकरी वर्गामध्ये लोकप्रिय आहेत.

लागवड 

 • बियाणे-एकरी १ ते दीड किलो
 • बीजप्रक्रिया –बिया 24-48 तास ओल्या फडक्यात किंवा पोत्यात बांधून ठेवाव्यात. बाविस्टीन 20 ग्रम प्रति लिटर बिजप्रक्रिया करावी.
 • शेतास उभी आडवी नांगरणी करुन ढेकळे फोडून काढावी व एक वखारणी द्यावी. शेतात चांगले कुजलेले 12 ते 15 गाडया शेणखत टाकावे. नंतर वखरणी करावी.
 • अंतर- जातीनुसार 90 ते 120 से.मी.अंतरावर सरया पाडून, टोकून करतात. दोन वेलीतील अंतर 45-60 से.मी.असावे. लागवड केल्यानंतर लगेच हलकेसे पाणी द्यावे.

खते व पाणी व्‍यवस्‍थापन

 • एकरी 10 टन शेणखत आणि 90 किलो युरिया, 120 किलो सुपर फाँस्फेट, 35 किलो म्युरेट आँफ पोटश द्यावे. अर्धा युरिया लागवड करताना द्यावा व उरलेली अर्धी मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावी.
 • खते वेलीभोवती बांगडी पद्धतीने द्यावीत आणि त्यानंतर पाणी द्यावे.
 • जमिनीचा मगदूर, हवामान व पीकाची अवस्था यानुसार साधारणपणे 4 ते 5 दिवसांच्‍या अंतराने पाणी द्यावे.

आंतरमशागत

 • काकडीचे वेलांना आधार दिल्‍यास फळांची प्रत सुधारते परंतू ते खर्चिक असल्‍याकारणाने महाराष्‍ट्रामध्‍ये काकडीचे पीक जमिनीवर घेतले जाते.
 • लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी पिकातील गवत काढून टाकावे. फळे लागल्‍यानंतर फळांचा संपर्क मातीशी येऊ नये म्‍हणून फळांखाली वाळलेला काटक्‍या घालाव्‍यात. तथापि ताटी केल्यास उत्पन्न वाढते.

पीक संरक्षण

पिकाचे वेळोवेळी निरिक्षण करुन एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनाकरिता कृषिसमर्पण समूहाशी संपर्क साधावा.

काढणी व उत्‍पादन

फळे कोवळी असतानाच काढणी करावी म्‍हणजे बाजारात चांगला भाव मिळतो. काकडीची तोडणी दर दोन ते तीन दिवसांच्‍या अंतराने करावी. जाती व हंगामानुसार काकडीचे एकरी 80 ते 120 क्विंटल पर्यंत उत्‍पादन मिळते.

 • उन्हाळ्यामध्ये लागवड करताना शेडनेटचा वापर केल्यास उत्तम.
 • मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाच्या वापराने तण वाढीला फाटा देवून, पाणी बचत होवून उत्पन्न वाढते.
 • मादी फुलांचे प्रमाण वाढविण्यासाठी जिब्रेलीक असिड 10-25 पीपीएम किंवा बोरॉन 3 पीपीएम यांच्या फवारण्या पीक दोन आणि चार पानांवर असताना कराव्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here