नवी दिल्ली : PM-Kisan Scheme | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मागील आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM-Kisan Scheme) योजनेचा 9 वा हप्ता जारी केला होता.
9 व्या हप्त्यात सरकारने 19,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट 9.75 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवली होती.
तुम्ही सुद्धा किसान सम्मान निधी लाभार्थी शेतकरी असाल आणि काही कारणामुळे तुमच्या खात्यात 9 व्या हप्त्याचे पैसे आले नसतील तर घाबरून जाण्याची गरज नाही.
तुम्ही पीएम किसान योजनेच्या टोल फ्री हेल्पलाईन नंबरवरून योजनेशी संबंधीत कोणतीही तक्रार दाखल करू शकता.
कोणत्या कारणामुळे तुमचे अडकले आहेत याची माहितीही तुम्हाला मिळू शकते.
हेल्पलाईन नंबरवर करू शकता संपर्क
- PM Kisan Scheme योजनेच्या 9 व्या हप्त्याची माहिती घेण्यासाठी टोल फ्री नंबर 1800115526 वर कॉल करून तक्रार करू शकता.
- कोणत्याही प्रकारची माहिती घेण्यासाठी किंवा तक्रार,
चौकशीसाठी हेल्पलाईन नंबर 155261 किंवा Toll Free नंबर 1800115526 वर सुद्धा कॉल करू शकता. - तसचे कृषी मंत्रालयाकडून जारी नंबर 011-23381092 वर सुद्धा कॉल करू शकता.
- आधार कार्ड PM-Kisan Scheme शी जोडलेले नसेल तर तुमच्या खात्यात योजनेचा हप्ता येणार नाही.
- या योजनेसाठी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.
- या योजनेंतर्गत प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये मिळतात.