आजकाल नोकरी मिळत नसल्याने तरुण पिढी शेतीकडे वळताना दिसून येत आहे. तसेच युवक शेतीत आधूनिक पद्धतीचा वापर करुन वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुण व नव्या पिढीच्या शेतकऱ्याची यशोगाथा सांगणार आहोत.

उत्तर प्रदेशात लखनऊमध्ये राहणाऱ्या या तरुणाचे नाव शशांक भट्ट असे आहे. शशांकचे एमबीएपर्यंतचे शिक्षण झाले आहे, आणि तो आता शेती करीत आहे. विशेष म्हणजे त्या शेतीतून तो वर्षाला लाखोंची कमाई करत आहे.

२०१३ मध्ये एमबीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांना कळत नव्हते की काय करायचे, त्यामुळे त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यांचे मामा शेती करत असल्याने त्यांनी त्यांच्या मामांकडून शेतीची पुर्ण माहिती मिळवली, तसेच ६ महिने शेती शिकून घेतली आणि शेती करण्यास सुरुवात केली.

शशांक यांना माहित होते की पारंपारिक शेती केली तर जास्त फायदा होणाऱ नाही. त्यामुळे शशांक यांनी फळभाज्यांची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी बाजारातली लोकांची मागणी पाहिली आणि त्यांनी शिमला मिर्चीची लागवड केली.

शशांक यांनी पाच एकरमध्ये शिमला मिर्चीची लागवड केली. दोन वर्षात त्यांना पाच लाख खर्च आला पण त्यांची या शेतीतून १५ लाखांची कमाई झाली.

शिमला मिर्चीच्या शेतीतून झालेला फायद्यामुळे शशांकचा आत्मविश्वास वाढला. २०१९ मध्ये शशांक यांनी फ्लॉवरची शेती करण्याचा निर्णय घेतला.

फ्लॉवरच्या शेतीत वेळ खुप महत्वाचा असतो. कारण जर प्लॉवर जर सीजनच्या काहीवेळ आधीच बाजारात आणले, तर त्याचा चांगलाच नफा मिळतो. हे शशांक लक्षात आल्याने त्याने वेळेच्या आधीच प्लॉवरची लागवड केली, त्यामुळे सप्टेंबरपर्यंत फ्लॉवरचे उत्पन्न मिळाले.

शशांकने ही शेती २२ एकरमध्ये केली होती, त्यामुळे शशांकने ४० लाख रुपयांची कमाई केली. सध्या शशांक २ एकरमध्ये शिमला मिर्चीची शेती, २ एकरात काकडी, २ एकरात फ्लॉवरची शेती करत आहे, अशाप्रकारे शशांक महिन्याला लाखोंची कमाई करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here