सध्या अनेक शेतकरी शेतीत नवीन प्रयोग करीत आहेत. त्यासाठी अनेक संस्था मदत करीत आहेत. सरकारच्या अनेक योजनाही यासाठी प्रोत्साहन देत आहेत.
त्यामुळे फळबाग, भाजीपाला यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपल्याला प्रेरणा देत असतात. गोंदिया जिल्ह्यातील हेमराज पुस्तोडे या शेतकऱ्याची अशीच यशोगाथा आहे.
गोंदीया जिल्ह्यातील शेतकरी हेमराज श्रीराम पुस्तोडे हे शेतात नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांनी एक एकर शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नगदी पिकांची लागवड केली आहे. या पिकातून ते वर्षाला लाखो रुपयांची कमाई करीत आहेत.
हेमराज पुस्तोडे यांच्याकडे वडिलोपार्जित दिड एकर शेती आहे. त्यांना या छोट्याशा जमिनीतच चांगले उत्पन्न मिळवायचे होते, त्यामुळे त्यांनी प्रयोग करायचा निश्चय केला. त्यांचा प्रयोग एवढा यशस्वी झाला कि त्यांना परिसरात प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जाते.
एका शासकिय योजनेतून त्यांनी आपल्या जमिनीवर विहिर खोदली. त्यामुळे त्यांना बाराही महिने पुरेसे असे पाणी होते. त्यानंतर त्यांनी अर्ध्या एकर शेतीत धानाची लागवड सुरु केली.
पुढे जेव्हा धानाच्या उत्पादन घेतल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी मका, मिरची आणि मुंगाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यांनी तंत्रज्ञानाचा पुर्ण वापर करत हि शेती केली आहे. ही शेती करताना त्यांची पत्नीही त्यांची साथ देत आहे.
उत्पादन खर्च कमी येण्यासाठी सेंद्रीय शेतीचा वापर केला पाहिजे. तसेच जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी फळभाज्या पिकांवर निंबोळी-दशपर्णी अर्क, जीवामृत वापरले पाहिजे असे हेमराज पुस्तोडे यांनी म्हटले आहे.
- MICRO-IRRIGATION | सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत आणि पीक उत्पादनात वाढ शक्य
ही शेती करुन शेती करुन पुस्तोडे दाम्पत्याला चांगलाच नफा होत आहे, त्यात मक्यापासून ३८ हजार, मिरची २० हजार रुपयांचा नफा, तसेच चवळीच्या आणि भेंडीच्या लागवडीतून त्यांनी जुलै महिन्यापर्यंत चाळीस हजारांचे उत्पन्न घेतले होते. अशा प्रकारे हेमराज पुस्तोडे वर्षाला लाखोंची कमाई करीत आहेत.