ग्रामपंचायत व सरपंच

ग्रामपंचायत व सरपंचाला सचिवाच्या कामाबद्दल दुर्दैवाने समाधान वाटत नसेल तर त्यांनी गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार करावी.

ग्रामपंचायतीला आपल्या विश्वासाचा व हक्काचा सचिव मिळाला पाहिजे हा कायद्याचा हेतू असून तो त्यांचा अधिकारच आहे.

सध्या व्यवहारात गटविकास अधिकारी आवश्यकतेनुसार सचिवांची बैठक बोलावतात व त्यांना पंचायतीच्या दैनंदिन कामाबरोबर इतर कामाच्या बाबतीत हे लक्ष देतात, की कामे जी आहे ती कोणत्या नियमाने व कशी करावीत या बद्दल मार्गदर्शन करीत असतात.

सरपंच या बैठकीत उपस्थित नसतात त्यामुळे सचिवाला दिल्या गेलेल्या कामाच्या बाबतीत त्यांना कल्पना नसते. या दुहेरी व्यवस्थेमुळे त्यांचे नियंत्रण कमी होते म्हणून पंचायतीच्या कामाचा हिताच्या दृष्टीने गटविकास अधिकाऱ्यांची जबाबदारी विशेष आहे.

सरपंचाने सचिवाचा उपस्थिती व कामाबद्दल तक्रार केल्यास गट विकास अधिकारी यांनी तत्परतेने लक्ष दिले पाहिजे. मासिक सभा व ग्रामसभा कायद्याने वेळेवर बोलावण्याचे सरपंचाची जबाबदारी असून सचिव आणि त्यानुसार योग्य वेळी ती बोलावली जाण्याबद्दल सरपंचांच्या सूचनेचे पालन केले पाहिजे.

ग्रामपंचायत व सरपंचाने घेतलेल्या निर्णयाबद्दल अंतिम दृष्ट्या त्यांना जबाबदार धरले पाहिजे. सध्या काही बाबतीत पंचायतीच्या निर्णयाबद्दल ही सचिवाला दोषी धरले जाते.

अधिकाऱ्यांबरोबर सरपंच यांचीही जबाबदारी असते व काही वेळा सचिवाला जबाबदार धरले जाते. अप्रत्यक्षरित्या पंचायतीचे अधिकार कमी केले जातात.

व्यवहारी कारणामुळे पंचायतीच्या पूर्ण नियंत्रणाखाली स्वतंत्र सचिव देता येत नसेल तर गटविकास अधिकारी यांना हे लक्षात घेऊन सचिवाच्या कामावर देखरेख ठेवली पाहिजे. सरपंच आणि आपले अधिकार समजून घेऊन सचिवाच्या सेवेचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here