Good News | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी मदत करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी 1 रुपयांचा पीक विमा जाहीर केला होता. मात्र, त्यावर सरकारने निर्णय घेतला नाही.
दरम्यान, राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
आता कृषी विभागाने पीक विमा योजना लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात 5 प्रकारच्या नुकसानीचा लाभ मिळू शकणार आहे.
आता त्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के आणि नगदी पिकांसाठी 5 टक्के रक्कम भरावी लागते.
मात्र आता सर्वंकष पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांच्या वाट्याचा भार राज्य सरकार उचलणार आहे. त्यामुळे शेतकरी फक्त 1 रुपये भरून बिमा पोर्टलवर नोंदणी करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.