मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यांतील आदिवासी कुटुंबांच्या अंगणात फळझाडे व भाजीपाला लावण्याची योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी 3.63 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने जारी केला आहे.
राज्यातील ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती व गोंदिया या 14 जिल्ह्यातील ‘आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजनासाठी’ सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी रुपये 3.63 लाख (रुपये तीन लाख त्रेसष्ठ हजार फक्त) इतकी रक्कम खर्च करण्यास वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.