PM Kisan Yojana 16th Installment Date : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचे पैसे फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील.
यामध्ये केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश आणि लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.
या मोहिमेअंतर्गत, शेतकऱ्यांनी EKYC प्रमाणीकरण, योजनेसाठी नवीन नोंदणी, बँक खाती आधार क्रमांकाशी लिंक करणे इत्यादी पूर्ण करण्यासाठी आधी हजर राहणे आवश्यक आहे.
EKYC प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांनी मोबाईलवरील OTP, सामिक सुविधा केंद्र, PMKisan फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एक सुविधा वापरावी. बँक खाती आधार लिंक नसलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये आधार लिंक केलेले खाते उघडावे.
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित होईल
मिळालेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वितरित केला जाईल. या मोहिमेत योजनेच्या निकषांतर्गत आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात यावी. या योजनेचा लाभ भरलेल्या लाभार्थ्यांनाच राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) लाभ देण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे प्रवीण गेडाम यांनी सांगितले.
6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या 45 दिवसांच्या मोहिमेदरम्यान, 1 लाख 4 हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणित केले आणि 3 लाख 1 हजार स्वयं-नोंदणीकृत शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली. हे अभियान प्रादेशिक स्तरावर प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.