Tomato Market : शेतकऱ्यांना कधी कोणते पीक आर्थिक लाभ मिळवून देईल तर कधी कोणते पीक डोळ्यात अश्रू आणेल हे काही सांगता येत नाही. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राब-राबून टोमॅटो पिकाची लागवड केली परंतु त्याच पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत.
टोमॅटोची मोठी आवक झाल्याने भावात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटो वाहतुकीचा खर्च आणि लागवडीचा खर्चही मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी पुनः एकदा टोमॅटोच्या पिकाने अडचणीत आला आहे. त्याच्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. बाजारात टोमॅटोची विक्री कवडीमोल दराने होत असल्याने बाजारातून घराकडे येत असताना अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यांच्या कडेला फेकून दिल्याचे पाहायला मिळाले.
बाजार समितीच्या आवारात एक किलो टोमॅटोला साधारणपणे प्रतवारीनुसार पाच ते दहा रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या आवारात नवीन टोमॅटोची आवक सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात ग्रेडनुसार एक किलो टोमॅटोचा भाव 60 ते 80 रुपयांवरून 10 ते 25 रुपयांवर गेला आहे.
टोमॅटोला उच्चांकी भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे. लागवड खर्च, वाहतूक खर्चही न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.
राज्यात टोमॅटोची लागवड पुणे जिल्ह्यातील नाशिक, खेड, मंचर, नारायणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर परिसरात टोमॅटोची लागवड केली जाते.
बाजारात टोमॅटो तीन ते चार रुपये किलोने विकला जात असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. भाजी मार्केटच्या लिलावात तीन कॅरेट टोमॅटो 15 रुपयांना विकला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
अत्यल्प दराने टोमॅटो विकला जात असल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. काही शेतकऱ्यांनी व्याजासह पैसे घेऊन टोमॅटोची लागवड केली होती, त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
टोमॅटोची लागवड नुकसानीची
टोमॅटोची लागवड करीत असताना शेतकऱ्यांना त्यासाठी जमिनीची चांगली मशागत करावी लागते. त्यानंतर योग्य अंतरावर रोपांची लागवड केली जाते. रोप वाढत असताना काही महिन्यात त्याचा वेल तयार होतो.
त्यानंतर शेतकऱ्यांना या टोमॅटोची बांधणी करावी लागते. त्यासाठी बांबू व तारांचा वापर केला जातो. या तारांच्या सहाय्याने टोमॅटोची रोपे वाढू लागतात. याची वाढ होत असताना त्याला टोमॅटोचे फळ येऊ लागतात.
हे टोमॅटोचे फळ लाल झाल्यानंतर त्याची बाजारात विक्री करण्यासाठी तोडणी केली जाते. टोमॅटोची लागवड ते काढणी या दरम्यान शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा खर्च येतो.
शेतातून टोमॅटो बाजारात विक्रीसाठी नेताना मालवाहू टेम्पोच्या भाड्याइतके हे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. टोमॅटो वेचण्यासाठी घेतलेल्या मजुरांना पगार देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. जगायचे की मरायचे, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
सरकारनेही व्यापाऱ्यांवर निर्बंध आणावेत
सरकारनेही व्यापाऱ्यांवर निर्बंध आणले पाहिजेत. व्यापारी आमच्याकडून 3 ते 5 रुपये किलोने टोमॅटो विकत घेतात आणि शहरात नेऊन 40 रुपये किलोने विकतात. टोमॅटोचे भाव कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहेत.
तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी टोमॅटोवर नांगर फिरविणे पसंत आहे. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कोण करणार? सरकार म्हणते फक्त नुकसान भरपाई देते पण एक रुपयाही देत नाही.
फेकण्यापेक्षा मिळेल त्या भावात विक्री
टोमॅटो वाहतूक खर्च, लागवड खर्च मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बाजार समितीच्या आवारात साधारणपणे एक किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार पाच ते दहा रुपये किलो भाव मिळत आहे.
त्यामुळे टोमॅटोला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. टोमॅटो फेकून देण्यापेक्षा बाजार समितीच्या आवारात मिळेल त्या भावात टोमॅटोची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लागवड खर्च, मजुरी, भराई, वाहतूक खर्च न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.