Orchard Cultivation | सध्या केंद्र सरकार आणि अनेक राज्य सरकारांकडून शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना राबविण्यात येत आहेत. बिहार सरकारही शेतीसाठी विविध योजना राबवत आहे. बिहार सरकारने फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना आणली आहे.
फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी बिहार सरकार आता शेतकऱ्यांना मोफत रोपे पुरवणार आहे. याशिवाय फळबाग लागवडीसाठीही अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सध्या फळबागा लागवडीकडे अनेक शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच बिहार सरकारने फळबाग शेतकऱ्यांसाठी एक योजना आणली आहे.
फळबागांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. परंतु फळबागा लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठा उत्पादन खर्च करावा लागतो. यामुळे शेतकरी याकडे वळत नाहीत.
बिहार सरकारने यासाठी 50 टक्के सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.