नमो शेतकरी महासन्मान योजनेचा ३२ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही; यामागचे कारण जाणून घ्या

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana Update | प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) चौदावा हप्ता आता 10 जूनपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचवेळी राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) पहिला हप्ता 71 लाख शेतकऱ्यांना देणार आहे. केंद्राच्या निकषांची पूर्तता न केल्यामुळे सध्या राज्यातील 32 लाख 37 हजार शेतकरी राज्य सरकारच्या पहिल्या हप्त्या पासून वंचित राहणार आहेत.

अल्प आणि अत्यल्प जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्रात 1 डिसेंबर 2018 पासून सुरू करण्यात आली आहे. देशातील दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना  2000 रुपये (दर चार महिन्यांतून एकदा) ची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून आता चौदावा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे.

पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता कधी येणार? कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत? संपूर्ण अपडेट जाणून घ्या

दरम्यान, मार्चच्या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली. त्याचा लाभ 1 एप्रिल 2023 पासून शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्य योजनेचे निकष केंद्राच्या निकषांप्रमाणेच असणार आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना जे लाभ मिळतात, तेच लाभ राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार आहे.

या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. तसेच ई-केवायसी आणि संबंधित शेतकऱ्याने त्याच्या नावावर मालमत्तेची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, राज्यातील 32 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. येत्या काही दिवसांत (चौदावा हप्ता मिळण्यापूर्वी) केंद्र सरकारच्या नियमानुसार अटींची पूर्तता केल्यास त्या शेतकऱ्यांनाही फायदा होईल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ न मिळणारे शेतकरी

  • आधार सिडिंग न केलेले : ११ लाख
  • जमिनीची माहिती न दिलेले : २.६६ लाख
  • ई-केवायसी केली नाही : १८.७१ लाख
  • एकूण अपात्र लाभार्थी : ३२.३७ लाख

 

Leave a Comment