Train Insurance : 10 लाखांपर्यंतचा विमा फक्त 35 पैशांमध्ये, रेल्वेचे तिकीट बुक करताना ही चूक करू नका

Train Insurance : ओडिशातील बालासोर येथे भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघाताने सारा देश हादरला. या अपघातात सुमारे 280 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. 900 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या जीवाची किंमत करता येणार नाही.

मात्र यामध्ये अनेकांनी आपल्या कुटुंबाचा आधार गमावला आहे. उद्या त्यांना सरकारी मदतही मिळेल, पण गमावलेले जीव परत येणार नाहीत. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) प्रवाशांना एक उत्तम सुविधा देते. IRCTC प्रवाशांना विमा संरक्षण देते. फक्त काही पैशांमध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळवा.

याकडे दुर्लक्ष करू नका

रेल्वे प्रवास करून  खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाण्याचा विचार केला तर नागरिक रेल्वेला सर्वाधिक पसंती देतात. ट्रेनने प्रवास करण्याचे फायदे आणि मजा काही औरच असते. डिजिटायझेशनमुळे आता घरबसल्या रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे.

तुमची सीट निवडण्यापासून ते जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. तिकीट बुक करताना रेल्वे प्रवाशांना विम्याचा पर्याय देते. त्यामुळे, प्रवासादरम्यान काही वाईट घडले, जसे की अपघात, विमा अशा परिस्थितीत संरक्षण प्रदान करतो.

सर्वात स्वस्त विमा संरक्षण

IRCTC ट्रेनमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना 10 लाखांपर्यंतची भरपाई 35 पैशांपर्यंत देते. लाखो रुपयांचे विमा संरक्षण केवळ काही पैशांमध्ये उपलब्ध आहे. मात्र तिकीट बुक करताना अनेकजण या पर्यायाकडे दुर्लक्ष करतात. हा पर्याय असल्याने प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. रेल्वे विभाग सर्वात स्वस्त विमा संरक्षण देते.

हा पर्याय उपलब्ध आहे

जेव्हा तुम्ही IRCTC वेबसाइटवरून रेल्वे तिकीट बुक करता, तेव्हा तुम्हाला पेमेंट प्रक्रियेदरम्यान प्रवास विम्याचा पर्याय दिला जाईल. तुम्ही हा पर्याय निवडल्यास, विमा संरक्षण उपलब्ध आहे. प्रवाशांना केवळ 35 पैशांमध्ये 10 लाखांपर्यंत नुकसान भरपाई मिळते. विशेष म्हणजे एका PNR द्वारे जितक्या प्रवासाची तिकिटे बुक करता येतील. हा विमा त्यांना लागू होतो.

हा विमा उपलब्ध आहे

भारतीय रेल्वे आणि पर्यटन महामंडळाच्या वेबसाइटनुसार, 10 लाखांपर्यंतची भरपाई फक्त 35 पैशांमध्ये उपलब्ध आहे. या विम्यामध्ये आंशिक अपंगत्व, अपंगत्व, गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च, मृत्यू यांचा समावेश आहे. विम्याची रक्कम वेगवेगळ्या श्रेणीनुसार दिली जाते.

अशी मिळते मदत

  • आयआरसीटीसी विमा संरक्षण देते
  • तिकीट बुक करताना विमा पर्याय निवडावा लागतो
  • गंभीर दुखापत झाल्यास 2 लाखा रुपयांपर्यंतची मदत
  • आंशिक अपंगत्व आल्यास 7.5 लाखांचे संरक्षण
  • अपंगत्व, मृत्यू ओढावल्यास 10 लाखांची भरपाई
  • मृतदेह वाहनातून नेण्यासाठी 10 हजारांची मदत

Leave a Comment