सरकारची मोठी घोषणा : आता सरकार शेतकऱ्यांना 3 वर्षांसाठी देणार मोफत पीक विमा

Big Announcement of Government | सध्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला आहे. आता यावर ओडिशा सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आता ओडिशातील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी एक रुपयाही भरावा लागणार नाही, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.

सहकार विभाग 2023 खरीप हंगाम ते 2025-26 रब्बी हंगामापर्यंत विमा हप्ता गोळा करेल. शेतकऱ्यांना मोफत पीक विमा देणारे ओडिशा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळे अन्य सरकार निर्णय कधी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

येथील शेतकऱ्यांना पुढील तीन वर्षे पीक विम्याचा हप्ता भरावा लागणार नाही. ओडिशाचे सहकार मंत्री अतानु सब्यसाची नायक यांनी सांगितले की, सरकारने 2023 ते 2026 या तीन वर्षांसाठी पीक विमा प्रीमियममधील शेतकऱ्यांचा हिस्सा उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

ओडिशा सरकार खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2026 पर्यंत शेतकऱ्यांचा हिस्सा घेणार आहे. यामुळे शेतकऱ्यांवर ताण येणार नाही. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Leave a Comment