Aadhaar Update Online | आता तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ऑनलाइन करू शकता व्हेरीफाय, प्रक्रिया जाणून घ्या

Aadhaar Update Online | UIDAI ने त्यांच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर एक नवीन वैशिष्ट्यपूर्ण सेवा सुरू केली आहे. ही सेवा नागरिकांना त्यांचा आधार लिंक केलेला मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरिफिकेशन करण्यास मदत करते. या फीचरचा उद्देश अशा आधार धारकांना मदत करणे आहे, ज्या नागरिकांना आपला कोणता मोबाईल नंबर आधार कार्ड सोबत लिंक केला आहे. आधार कार्ड सोबत कोणता मोबाईल नंबर नोंदवला गेला आहे याची माहिती नाही.

UIDAI ने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यामुळे नागरिकांना भिती वाटत होती की आपल्या आधार सोबत जोडलेल्या नंबर वर OTP दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्ती सोबत शेअर होईल किंवा त्या मोबाईल नंबरवर जात आहे. आता, या सुविधेमुळे, नागरिक ही माहिती अगदी सहजपणे पाहू शकतात. ही सुविधा अधिकृत वेबसाइटवर किंवा mAadhaar ऐपद्वारे ‘व्हेरिफाय ईमेल/मोबाइल नंबर’ या वैशिष्ट्यांतर्गत मिळू शकते.

ही सुविधा नागरिकांना याची खात्री करून देते की आधार संबंधी सलग्न माहितीचा ईमेल/मोबाइल नंबर केवळ संबंधित आधारशी जोडलेला आहे. ही सुविधा रहिवाशांना मोबाईल नंबर लिंक नसल्यास अलर्ट देखील करते आणि ते इच्छित असल्यास मोबाईल नंबर अपडेट देखील करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

ऑनलाइन आधार पडताळणीचे फायदे

  • ऑनलाइन पडताळणी सेवा आधार धारकांना विविध प्रकारे मदत करेल.
  • हे नागरिकांना त्यांच्या आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तपासण्याची आणि अपडेट करण्याची परवानगी देते.
  • ही सेवा खात्री करून देईल की आधारसोबत नोंदणीकृत ईमेल आणि मोबाइल क्रमांक खात्रीलायक आणि योग्य आहेत.
  • मोबाईल नंबर लिंक केलेला नसल्यास रहिवाशांना देखील ते अलर्ट करेल आणि त्यांना हवे असल्यास ते अपडेट करण्याचा सल्ला देईल, आणि अपडेट करता येईल.
  • रहिवासी त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाचे शेवटचे तीन अंक वेबसाइट किंवा अॅपवर आधार पडताळणी वैशिष्ट्यावर देखील तपासू शकतात.
  • या सुविधेमुळे नागरिकांना त्यांचे आधार डीटेल्स सुरक्षित ठेवण्यास आणि त्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर टाळण्यास मदत होईल.
  • https://uidai.gov.in/ अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर mAadhaar अॅप डाउनलोड करा. यावर जाऊन तुम्हाला ‘व्हेरिफाय ईमेल/मोबाइल नंबर’ सुविधा मिळेल.
  • अधिकृत वेबसाइटवर दिलेली माहिती तपासून पहा आणि अपडेट करा आणि घरबसल्या आधार-मोबाईल-इमेल व्हेरीफाय करून खात्री करून घ्या. माहिती आवडली तर नक्की शेअर करा.

Leave a Comment