बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय

Important Decision for 12th Students | ‘एचसीएल टेक’ या आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसोबत महाराष्ट्र समाज शिक्षाच्या माध्यमातून सामंजस्य करार करण्यात आला असून राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र यंग लीडर ऍस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम (MYLAP)’ राबविण्यात येणार आहे. दरम्यान, एचसीएल टेक कंपनीच्या ‘एचसीएल टेक-बी’ उपक्रमांतर्गत 38 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 20 हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

दरम्यान, ‘एचसीएल टेक-बी’ या उपक्रमांतर्गत, 12वी गणित विषय असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच सहा महिने थेट प्रकल्प आणि सहा महिन्यांसाठी सशुल्क प्रशिक्षणावर काम करण्याची संधी मिळेल. तसेच, एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयटी व्यावसायिक म्हणून पूर्णवेळ नोकऱ्या, पगार आणि त्यासोबत उच्च शिक्षण मिळण्याची योजना आहे. विद्यार्थी BITS Pilani, Shastra, Amity, IIM-Nagpur आणि KL सारख्या नामांकित विद्यापीठांमधून उच्च शिक्षण पूर्ण करतील. एचसीएल कंपनी उच्च शिक्षणासाठी काही रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरूपात देईल.

दरम्यान, संपूर्ण शिक्षा अभियान व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नांदेड आणि पुणे येथे घेण्यात आलेल्या मार्गदर्शन व नोंदणी कार्यशाळांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे लवकरच मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि इतर ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी, ज्या विद्यार्थ्यांनी 2023 साली 12वी विज्ञान विषयात किमान 60% आणि गणितात 60% गुण मिळवले आहेत ते www.hcltechbee.com या वेबसाइटवर विनामूल्य नोंदणी करू शकतात.

Leave a Comment